प्रकाशराव उर्फ बाळासाहेब कुड ल दि. १० (वार्ताहर) - कुंडल येथील मामासाहेब पवार सत्य विजय को-ऑप, बँक लि.कुंडल या बँकेस सन २०१९-२० या आर्थिक वर्षात रु. ४.४७ कोटी इतका ढोबळ नफा मिळविला आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये बारा शाखांव्दारे रु. ३३२.७३ कोटी पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.चालू आर्थिक वर्षांमध्ये बके चे भागभांडवल रु.९ कोटी ४४ लाख इतके असून स्वनिधी रु, २८ कोटी ७२ लाखांपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण ९% इतके असणे आवश्यक असताना बँकेने हे प्रमाण १५% इतके राखले आहे.बँकेच्या ठेवी रु.२०२ कोटी १४ लाख इतक्या असून कर्जे रु.१३० कोटी ५९ लाख मात्र असून एन.पी.ए.३.९७% इतका व गुंतवणूक रु.७९ कोटी ८९ लाख करा संग रिरहन इतकी आहे. त्याचप्रमाणे बँकेचे खेळते भांडवल रु, २३६ कोटी ५४ लाख इतके असून नेटवर्थ रु.१७ कोटी ९१ लाखापेक्षा जास्त आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार यांनी दिली,बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळातील सहकारी सदस्य व कर्मचारी यांचे मोठे योगदान असलेचेही त्यांनी सांगितले, तसेच लवकरच अंकलखोप,ता.पलूस येथे नविन शाखा सुरु करीत आहोत . यावेळी बँकेचे उपाध्यक्ष .दिलीपराव नलावडे, संचालक मंडळ सदस्य प्रशांत पवार, विकासराव लाड, रावसाहेब वाकळे, माणिकराव पाटील, पांडुरंग जाधव, संतोष गायकवाड, धोंडीराम पाटील, चंद्रकांत कदम, तुकाराम आमणे , व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सी.व्ही. कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑप.बँकेस ४.४७ कोटीचा नफा प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार