धुळगावचे पाणी सुरू करा
अॅड. अमित शिंदे; दिड महिना मोटारी बंद असल्याने नदी प्रदूषणात देखील वाढ
सांगली दि. १० - गेले दिड महिने शेरीनाल्याच्या धुळगाव योजनेचे पंप बंद असल्यामुळे धुळगाव परिसरातील शेतीला पाणी मिळेना झाले आहे. त्याचबरोबर पंप बंद असल्याने नदी प्रदूषण देखील वाढलेले आहे, त्यामुळे धुळगाव योजनेचे पाणी तात्काळ सुरू करावे अशी मागणी अॅड, अमित शिंदे व धूळगाव ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. याबाबत बोलताना अॅड, अमित शिंदे म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणा-या शेरीनाल्यामुळे कृष्णा नदीचे प्रचंड प्रदूषण होते. हे प्रदूषित पाणी सांगली, मिरजेची डोकेदुखी असल्याने हे पाणी नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण करून धुळगाव व परिसरातील शेतीला देण्यासाठी योजना बनविण्यात आली, हे पाणी धुळगाव व परिसरातील शेतीला उपयोगी पड ते . परत घळ गाव ला शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारे पंप वारंवार बंद ठेवले जात असल्याने पाण्याअभावी शेतीचे नुकसान होते. धुळगावकरांनी सांगली चे प्रदूषित पाणी स्वीकारून सुद्धा त्यांना ते वेळेवर मिळत नाही. तसेच याबाबत महापालिकेने अद्याप करारपत्र देखील केलेले नाही. एकीकडे महापालिका पाणी प्रदूषित केल्याबद्दल दंड भरत आहे आणि दुसरीकडे प्रदूषण टाळण्यासाठी सुरू के ले ली धुळगाव योजना कार्यान्वित करण्यास टाळाटाळ करत आहे. महापालिका, जीवन प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामधील समन्वयाच्या अभावी ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. सध्या लॉक डाउन मुळे सर्व निसर्ग प्रदूषण मुक्त होत असताना धुळगाव योजनेच्या अंमलबजावणी अभावी कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. याबाबत आज महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन निवेदन पाठवले आहे. या निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री मा, जयंत पाटील साहेब यांनाही माहीती व कार्यवाहीसाठी देण्यात आली, तसेच याबाबत महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी यांच्याशी अॅड, अमित शिंदे यांनी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उपाययोजना करत धुळगाव योजनेचे पंप सुरू करण्याची कार्यवाही करत असल्याचे सांगितले. या निवेदनावर अमर जाधव, अजित सिंह डुबल, भास्कर डुबल, दामाजी डुबल, डॉ. विनोद डुबल, सागर डुबल यांच्या सह्या आहेत.